जानेवारी २०२१ चे अपडेट लागू होण्याच्या तारखेविषयी माहिती

अपडेट लागू होण्याच्या तारखेस काय होईल?
१५ मे २०२१ रोजी लागू झालेल्या अपडेटचा स्वीकार न केलेल्या कोणाचेही खाते हटवले जाणार नाही किंवा त्यामुळे त्यांच्या WhatsApp च्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही.
अपडेट लागू होण्याची तारीख उलटून गेल्यावर काय होईल?
अपडेटविषयीचे नोटिफिकेशन पाहिलेल्या बऱ्याच वापरकर्त्यांनी अपडेटचा स्वीकार केला आहे हे पाहता, आम्ही यापुढेही अपडेटविषयीची माहिती WhatsApp मधील नोटिफिकेशनच्या रूपात दाखवत राहू आणि अपडेट न पाहिलेल्या वापरकर्त्यांना अपडेट वाचण्याची व स्वीकारण्याची संधी देऊ. सध्यातरी अपडेट स्वीकारण्याची आठवण करून देणारे अधिकाधिक रिमाइंडर्स पाठवण्याचा आणि ॲपची कार्यक्षमता मर्यादित करण्याचा आमचा इरादा नाही.
अपडेटचा स्वीकार न केलेल्या वापरकर्त्यांना यापुढेही ते अपडेट्स थेट ॲपमधूनच स्वीकारण्याच्या संधी मिळतील. उदा. एखादी व्यक्ती WhatsApp साठी पुन्हा नोंदणी करेल किंवा अपडेटशी निगडित फीचर पहिल्यांदाच वापरण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्यांना अपडेटचा स्वीकार करण्यास सांगितले जाईल.
तुम्ही Android किंवा iPhone वरील पूर्वीचे चॅट एक्स्पोर्ट करू शकता आणि तुमच्या खात्याचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता.
  • तुम्ही स्वतः तुमचे चॅट एक्स्पोर्ट करू शकता आणि तुमच्या खात्याचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता. तुम्हाला तुमच्या खात्याचा रिपोर्ट डाउनलोड करण्याविषयी किंवा तुमचे खाते हटवण्याविषयी माहिती हवी असल्यास, तुम्ही आमच्याशी येथे संपर्क साधू शकता.
तुम्ही अपडेट स्वीकारला नाही तरी WhatsApp तुमचे खाते डीलीट करणार नाही.
  • लक्षात ठेवा की स्वतंत्रपणे, निष्‍क्रिय वापरकर्त्यांबद्दलचे आमचे विद्यमान धोरण लागू होईल.
  • तुम्हाला Android, iPhone किंवा KaiOS वरील खाते हटवण्याची इच्छा असेल, तर तुम्ही त्याचा पुनर्विचार करावा असे आम्हाला मनापासून वाटते. तुम्ही खाते हटवण्याचा निर्णय घेतल्यास तुमचे पूर्वीचे मेसेजेस हटवले जातील, तुम्हाला तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप्समधून काढले जाईल आणि तुमचे WhatsApp बॅकअप्स हटवले जातील. आणि त्यानंतर आम्हाला हे पहिल्यासारखे करता येणार नाही.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही