WhatsApp वरील ॲक्सेसिबिलिटी फीचर्सविषयी माहिती

Android
iPhone
तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमधून WhatsApp साठी ॲक्सेसिबिलिटी फीचर्स सुरू करू शकता. iPhone असल्यास तुम्ही हे करू शकता:
  • वाचिक फीडबॅक किंवा VoiceOver जेस्चर्सच्या मदतीने तुमच्या डिव्हाइससोबत संवाद साधायचा असल्यास, VoiceOver सुरू करू शकता. WhatsApp कॅमेरा वापरून स्वतःचा फोटो कसा घ्यावा याबद्दल मदत मिळवण्यासाठी तुम्हाला VoiceOver वापरता येईल.
  • WhatsApp वरील मेसेजेस वाचण्यासाठी आणि कॉल करण्यासाठी Siri चा वापर करू शकता.
  • डिस्प्ले किंवा फॉंट साइझ ॲडजस्ट करू शकता, तुमची स्क्रीन तात्पुरती झूम करू शकता किंवा ती मोठ्या आकारात पाहू शकता आणि कॉंट्रास्ट किंवा रंग ॲडजस्ट करू शकता.
तुमच्या फोनवर उपलब्ध असलेल्या ॲक्सेसिबिलिटी फीचर्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया Apple सपोर्ट वेबसाइटवर जा.
ॲक्सेसिबिलिटी संदर्भातील समस्यांची तक्रार नोंदवण्यासाठी किंवा सूचना कळवण्यासाठी तुम्ही आमच्याशी accessibility@support.whatsapp.com वर संपर्क साधू शकता.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही