“अखेरचे पाहिलेले” आणि “ऑनलाइन” विषयी माहिती

तुमचे संपर्क ऑनलाइन आहेत का किंवा त्यांनी अखेरीस केव्हा WhatsApp वापरले, हे तुम्हाला “अखेरचे पाहिलेले” आणि “ऑनलाइन” या फीचर्सच्या मदतीने कळते.
संपर्क ऑनलाइन असेल, तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या डिव्हाइसवर WhatsApp फोरग्राउंडवर सुरू असून ते इंटरनेटशी जोडले गेलेले आहे असा होतो. याचा अर्थ असा नाही, की त्यांनी तुमचा मेसेज वाचला असेल.
'अखेरचे पाहिलेले' मधून त्या व्यक्तीने WhatsApp अखेरीस कधी वापरले होते हे कळते. आमच्या गोपनीयता सेटिंग्जमधून तुम्ही तुमचे 'अखेरचे पाहिलेले' आणि 'ऑनलाइन' कोण पाहू शकते ते नियंत्रित करू शकता. एखादी व्यक्ती तुम्हाला संपर्क म्हणून सेव्ह करत नाही तोपर्यंत किंवा ते तुम्हाला मेसेज करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' स्टेटस पाहू शकणार नाही.
तुमचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' कोण पाहू शकते हे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही सेटिंग्ज वापरू शकता. कसे ते जाणून घ्या.
पुढील काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या संपर्काचे 'अखेरचे पाहिलेले' किंवा 'ऑनलाइन' स्टेटस पाहू शकत नाही:
  • त्यांनी कदाचित त्यांच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये ही माहिती लपवण्याची सोय केली असेल.
  • तुम्ही कदाचित तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये ही माहिती शेअर न करण्याची सोय केली असेल. तुम्ही तुमचे “अखेरचे पाहिलेले” शेअर केले नसेल, तर तुम्ही इतरांचे “अखेरचे पाहिलेले” पाहू शकत नाही.
  • त्यांनी कदाचित तुम्हाला ब्लॉक केले असेल.
  • तुम्ही त्यांच्याशी यापूर्वी चॅट केले नसेल.
  • त्यांनी तुमचा संपर्क सेव्ह केला नसेल.
टीप: तुमच्यासोबत चॅट थ्रेडवर ऑनलाइन असणारे लोक तुम्ही टाइप करत आहात हे पाहू शकतील.
संबंधित लेख:
गोपनीयता सेटिंग्जविषयी जाणून घ्या: Android | iPhone
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही