'कार्ट' विषयी माहिती

तुम्ही WhatsApp Business ॲप वापरत असल्यास, 'कार्ट' या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या ग्राहकांना ऑर्डर करण्यात मदत करू शकता. कार्ट हा ग्राहकांना त्यांची ऑर्डर प्रक्रिया सुरू करण्यासाठी देऊ केलेला मार्ग आहे.
WhatsApp Messenger ॲप वापरणारे ग्राहक तुमच्याशी चॅट करतील किंवा तुमच्या बिझनेस प्रोफाइलला भेट देतील, तेव्हा त्यांना तुमच्या बिझनेसच्या नावाच्या बाजूला शॉपिंग बटण दिसेल. हे शॉपिंग बटण वापरून ग्राहक तुमचा कॅटलॉग ब्राउझ करू शकतील आणि तुमच्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट्स त्यांच्या कार्टमध्ये जोडू शकतील.
प्रॉडक्ट्स जोडून झाल्यानंतर, ग्राहक कॅटलॉग मेनूमधील किंवा बिझनेससोबतच्या त्यांच्या मेसेजमधील कार्ट आयकॉनवर टॅप करून त्यांची कार्ट ॲक्सेस करू शकतात. तिथून, ते त्यांच्या कार्टमधील प्रत्येक प्रॉडक्टचे नग कमी-जास्तही करू शकतात. ग्राहक चेक आउट करण्यास तयार असतील, तेव्हा ते त्यांच्या कार्टमधील प्रॉडक्ट्स एका WhatsApp मेसेजच्या रूपात तुमच्या बिझनेस खात्यावर पाठवू शकतील.
हे फीचर तुमच्या विद्यमान ग्राहकांना पुढील सुविधा देईल:
  • झटपट ऑर्डर करणे
  • एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट्सविषयी प्रश्न विचारता येतील
  • एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट्सची ऑर्डर देणे
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही