WhatsApp वर जे मेसेजेस फॉरवर्ड म्हणून आलेले असतात त्यांच्याविषयी इंटरनेटवर कसे सर्च करावे
तुम्हाला जर असा एखादा मेसेज आला असेल जो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे अनेकवेळा फॉरवर्ड झाला असेल तर, त्या मेसेजमधील माहितीची शहानिशा करण्यासाठी WhatsApp चॅट मधूनच तुम्ही त्या माहितीचा शोध इंटरनेटवर घेऊ शकता. अशा मेसेजेसवर दोन बाणांचे चिन्ह
असते. हे फीचर सध्या अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, डोमिनिकन रिपब्लिक, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, मेक्सिको, नायजेरिया, पेरू, स्पेन, युनायटेड किंगडम, व्हेनेझुएला या देशांमधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

टीप: जर तुम्ही मेसेजमधील मजकुराचा इंटरनेटवर शोध घ्यायचे ठरवले तर, हे फीचर वापरून तुम्ही मेसेजमधील मजकूर WhatsApp सह शेअर न करता परस्पर Google वर अपलोड करू शकता. Google च्या 'सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण' लागू होईल.
- मेसेजच्या बाजूला शोधावर टॅप करा.
- वेबवर शोध घ्या वर टॅप करा.
- यानंतर तुम्हाला वेब ब्राउझरवर नेले जाईल, जिथे तुमचे मेसेजसंबंधी रिझल्ट्स Google मध्ये दाखवले जातील.
संबंधित लेख: