आम्ही आमच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण जानेवारी २०२१ रोजी अपडेट केले

आम्ही WhatsApp वर बिझनेस आणि त्यांचे ग्राहक यांच्यामध्ये होणाऱ्या मेसेजिंगशी संबंधित सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणामध्ये बदल केले आणि ते जानेवारी २०२१ मध्ये रोल आउट करण्यास सुरुवात केली. या अपडेटचा भाग म्हणून, आम्ही डेटा कसा गोळा करतो, शेअर करतो आणि वापरतो याविषयीदेखील अधिक माहिती दिली आहे.
तुमची गोपनीयता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. तुमची वैयक्तिक संभाषणे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतात, याचाच अर्थ तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत संभाषण करत आहात ती व्यक्ती यांव्यतिरिक्त इतर कोणीही ते संभाषण वाचू किंवा ऐकू शकत नाही, अगदी WhatsApp अथवा Meta देखील नाही.
या अपडेटमुळे नेमके कोणते बदल होणार आहेत हे स्पष्ट करणे ही आमची जबाबदारी आहे. तुम्हाला माहीत असायला हव्यात अशा काही गोष्टी खालीलप्रमाणे:
काय बदलले
तुम्ही WhatsApp वर बिझनेसेससोबत जास्त बोलू शकता. फोन किंवा ईमेलने बिझनेसशी संपर्क साधण्यापेक्षा हे जास्त सत्वर आणि सोयीचे असेल. हे पूर्णपणे पर्यायी आहे.
दररोज कोट्यवधी लोक WhatsApp वरील लहानमोठ्या बिझनेसेससोबत संभाषण करत असतात. तुम्हाला एखाद्या बिझनेसच्या प्रॉडक्ट्सविषयी प्रश्न असल्यास, खरेदी करायची असल्यास किंवा प्रॉडक्टविषयी माहिती मिळवायची असल्यास तुम्ही त्या बिझनेसला मेसेज पाठवू शकता. लक्षात घ्या, WhatsApp वर एखाद्या बिझनेससोबत चॅट करावे की नाही हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. तुम्ही तुमच्या संपर्कांमधील बिझनेसेसना काढून टाकू शकता किंवा त्यांना ब्लॉक करू शकता.
एखादी एअरलाइन किंवा रिटेलर यांच्याशी दररोज हजारो ग्राहक फ्लाइटची माहिती विचारण्यासाठी असो किंवा त्यांची ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी असो, संपर्क साधतात. अशा प्रकारचे बिझनेसेस त्यांच्या ग्राहकांना सत्वर उत्तरे देण्यासाठी आणि त्यांच्या वतीने हे मेसेजेस हाताळण्यासाठी एक तंत्रज्ञान पुरवठादार म्हणून Meta चा वापर करून घेऊ शकतात. तुम्ही एका बिझनेसशी चॅट करत आहात हे दर्शवण्यासाठी आम्ही त्या चॅटला तसे स्पष्ट लेबल देतो.
आम्ही डेटा कसा गोळा करतो, शेअर करतो आणि वापरतो याविषयी आम्ही आणखी स्पष्टीकरण दिले आहे.
गोपनीयता धोरणातील बदलांमुळे आम्ही तुमची माहिती कशाप्रकारे व्यवस्थापित करतो याविषयी तुम्हाला जास्त माहिती मिळणार आहे. आम्ही आमच्या गोपनीयता धोरणातील काही भागांमध्ये अधिक स्पष्टीकरण दिले आहे आणि नवे माहितीपर भागही समाविष्ट केले आहेत. आम्ही आमच्या गोपनीयता धोरणाचा लेआउटदेखील बदलला आहे. आता वापरकर्त्यांना गोपनीयता धोरण वाचताना नेव्हिगेट करणे आणखी सोपे होणार आहे.
तुमच्या WhatsApp खात्याची माहिती आणि सेटिंग्ज यांचा रिपोर्ट येथून डाउनलोड करता येईल.

काय बदलत नाही आहे
तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यासोबतच्या वैयक्तिक चॅट्सची गोपनीयता व सुरक्षा कधीच बदलणार नाही.
तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना पाठवता ते वैयक्तिक मेसेजेस व कॉल्स, तुम्ही शेअर करता त्या अटॅचमेंट्स किंवा तुम्ही पाठवता ते लोकेशन, यांपैकी काहीही WhatsApp किंवा Meta वाचू अथवा ऐकू शकत नाही. कोण कोणाला मेसेज किंवा कॉल करते आहे याचे लॉग्स आम्ही ठेवत नाही. WhatsApp तुमचे संपर्क Meta सोबत शेअर करत नाही.

तुमच्या डेटावर तुमचे नियंत्रण असते. एखाद्या बिझनेससोबत तुमचा नंबर शेअर करावा की नाही हा निर्णय फक्त तुमचा असतो. तुम्ही एखाद्या बिझनेसला कधीही ब्लॉक करू शकता.
WhatsApp तुमचा नंबर बिझनेसला देणार नाही आणि WhatsApp च्या धोरणांनुसार तुमची मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही बिझनेसला तुमच्याशी संपर्क साधता येणार नाही.
तुमचे मेसेजेस विशिष्ट कालावधीनंतर नाहीसे व्हावेत अशा पद्धतीने सेटिंग करणे किंवा तुम्हाला ग्रुप्समध्ये कोण समाविष्ट करू शकते यावर नियंत्रण ठेवणे, अशा अतिरिक्त गोपनीयता फीचर्समुळे तुमची गोपनीयता आणखी सुरक्षित राहते.

तुम्ही आमच्या नव्या सेवाशर्ती स्वीकारल्यामुळे WhatsApp ची Meta या पालक कंपनीसोबत डेटा शेअर करण्याची क्षमता वाढत नाही.
अधिक माहितीसाठी आमच्या अटी आणि गोपनीयता धोरण पहा. वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे पाहता येतील.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही