फोन नंबर बदलण्याविषयी माहिती

'नंबर बदला' या फीचरमुळे तुम्हाला WhatsApp शी लिंक असलेला फोन नंबर बदलण्यात मदत होते. WhatsApp मध्ये तुमचा फोन नंबर बदलल्याने पुढील गोष्टी होतात:
  • तुमच्या जुन्या फोन नंबरवरून नवीन फोन नंबरवर तुमचा प्रोफाइल फोटो, नाव, माझ्याबद्दल, वैयक्तिक चॅट्स, ग्रुप चॅट्स आणि सेटिंग्ज यांचा समावेशासह तुमची खाते माहिती ट्रान्सफर होते.
  • तुमच्या जुन्या फोन नंबरशी निगडित असलेले WhatsApp खाते काढून टाकले जाते, ज्यामुळे तुमचे संपर्क तुमचा जुना फोन नंबर त्यांच्या WhatsApp संपर्क यादीमध्ये पाहू शकणार नाहीत.
तुमच्या संपर्कांना तुमचा फोन नंबर बदलल्याचे सूचित करायचे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही फोन नंबर बदलला आहे याची सूचना तुमच्या ग्रुप चॅटना मिळेल. तुम्ही फोन नंबर बदलला आहे हे तुमच्या संपर्कांना कळवण्याबाबतच्या निवडीचा यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही तुम्हाला तुमचे फोन नंबर्स बदलण्याआधी तुमच्या संपर्कांना तुमच्या नवीन फोन नंबरबद्दल सूचित करण्याची शिफारस करतो. त्यांना त्यांच्या फोनच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये आवश्यक ते बदल करण्यास सांगा.
टीप: तुम्ही तुमचा फोन नंबर बदलल्यास आणि नवीन फोन नंबरसाठी तोच फोन वापरत असल्यास, तुमचे पूर्वीचे चॅट तुमच्या फोनवर उपलब्ध असेल.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही