फोन नंबर कसा बदलावा याविषयी माहिती

'नंबर बदला' या फीचरमुळे तुम्हाला तुमच्या WhatsApp खात्याशी लिंक केलेला फोन नंबर बदलता येतो. WhatsApp शी लिंक असलेला फोन नंबर बदलल्यास:
  • तुमचा प्रोफाइल फोटो, नाव, तुमची माहिती अशी खाते माहिती, तुमचे वैयक्तिक चॅट व ग्रुप चॅट आणि तुमच्या जुन्या फोन नंबरवरील सेटिंग्ज हे सर्व जुन्या फोन नंबरवरून नवीन फोन नंबरवर हलवले जाईल.
  • तुमच्या जुन्या फोन नंबरशी लिंक असलेले खाते काढून टाकले जाईल. त्यानंतर तुमचे संपर्क तुमचा जुना फोन नंबर त्यांच्या WhatsApp च्या यादीमध्ये पाहू शकणार नाहीत.
तुम्ही फोन नंबर बदलला आहे हे तुमच्या संपर्कांना कळवावे किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही फोन नंबर बदलला आहे याची सूचना तुमच्या ग्रुप चॅटना मिळेल. तुम्ही फोन नंबर बदलला आहे हे तुमच्या संपर्कांना कळवण्याबाबतच्या निवडीचा यावर काही परिणाम होणार नाही. यापुढेही तुमच्या संपर्कांच्या संपर्कात राहायचे असल्यास तुम्ही नंबर बदलला असल्याचे तुमच्या संपर्कांना कळवा आणि त्यांना त्यांच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये योग्य ते बदल करण्याची विनंती करा असे आम्ही सुचवतो.
टीप: तुम्ही फोन नंबर बदलला, पण नवीन नंबरसाठी फोन तोच ठेवला तर, तुम्हाला तुमचे पूर्वीचे चॅट ॲक्सेस करता येईल.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही