व्हॉइस मेसेजेस कसे प्ले करावेत
वेब आणि डेस्कटॉप
Windows
Android
iPhone
KaiOS
WhatsApp वर आलेले व्हॉइस मेसेजेस आपोआप डाउनलोड होतात.
तुम्हाला आलेल्या व्हॉइस मेसेजेसवर तुम्हाला पुढील चिन्हे दिसतील:
- तुम्ही प्ले न केलेल्या व्हॉइस मेसेजेसवर हिरवा मायक्रोफोन दिसेल.
- तुम्ही प्ले केलेल्या व्हॉइस मेसेजेसवर निळा मायक्रोफोन दिसेल.
व्हॉइस मेसेज प्ले करणे
- तुम्ही पाठवलेले किंवा तुम्हाला आलेले व्हॉइस मेसेजेस ऐकण्यासाठी प्ले करावर क्लिक करा.
- पुढील प्रकारे मेसेज ऐका.
- तुमच्या कॉंप्युटरच्या स्पीकरमधून: तुमच्या कॉंप्युटरच्या स्पीकरमधून मेसेज प्ले करा.
- तुमच्या हेडफोन्समधून: हेडफोन्स कनेक्ट केलेले असल्यास व्हॉइस मेसेजेस हेडफोन्समधून प्ले होतील.
- मेसेज प्ले होत असताना, तुम्ही 1x चिन्हावर टॅप करून वेग 1.5x किंवा 2x इतका वाढवू शकता.
- तुम्ही वेव्हफॉर्मवर असलेल्या बिंदूवर क्लिक करू शकता आणि तुम्हाला मेसेज ज्या टाइमस्टँपवरून प्ले करायचा आहे तिथे तो बिंदू ड्रॅगदेखील करू शकता.
- तुम्ही WhatsApp मध्ये दुसऱ्या चॅटवर किंवा ग्रुपवर नेव्हिगेट केले, तरीही व्हॉइस मेसेजेस प्ले होत राहतील.
- तुम्ही व्हॉइस मेसेज प्ले करता आणि चॅट सोडून जाता, तेव्हा तुमच्या विंडोच्या तळाशी डावीकडे एक मिनी प्लेअर दिसेल.
- तुम्ही व्हॉइस मेसेज थांबवू शकता, प्ले करू शकता आणि तो बंद करू शकता किंवा मूळ चॅटवर परत जाऊ शकता.
संबंधित लेख: