व्हॉइस कॉल कसा करावा

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
व्हॉइस कॉलिंगमुळे तुम्ही कॉल करत असलेली व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये असली, तरीही WhatsApp वापरून तुम्ही त्यांना मोफत कॉल करू शकता. व्हॉइस कॉलिंग तुमच्या फोनच्या मोबाइल प्लॅनच्या मिनिटांऐवजी फोनमधील इंटरनेट कनेक्शन वापरते. त्यामुळे, डेटा शुल्क लागू शकते.
व्हॉइस कॉल करणे
  1. तुम्हाला ज्या संपर्काला कॉल करायचा आहे त्या संपर्कासोबत वैयक्तिक चॅट सुरू करा.
  2. व्हॉइस कॉल
    वर टॅप करा.
किंवा WhatsApp उघडा, त्यानंतर कॉल्स टॅब > नवीन कॉल
यावर टॅप करा. तुम्हाला ज्या संपर्काला व्हॉइस कॉल करायचा आहे तो संपर्क शोधा, त्यानंतर व्हॉइस कॉल
वर टॅप करा.
व्हॉइस कॉल घेणे
तुमचा फोन लॉक केलेला असल्यास, कोणीतरी तुम्हाला कॉल केल्यावर तुम्हाला इनकमिंग WhatsApp Audio... स्क्रीन दिसेल, जेथे तुम्ही हे करू शकता:
  • कॉलला उत्तर देण्यासाठी उत्तर देण्याकरिता स्लाइड करा हे उजवीकडे स्वाइप करा.
  • मला आठवण करा वर टॅप करा, त्यानंतर मी बाहेर पडताना किंवा एका तासामध्ये यांमधील तुम्हाला जेव्हा आठवण करून द्यायची आहे तो पर्याय निवडा.
  • iPhone च्या बाजूच्या भागात असलेले पॉवर बटण दोनदा दाबून कॉल नाकारा.
तुमचा फोन अनलॉक केलेला असल्यास, कोणीतरी तुम्हाला कॉल केल्यावर तुम्हाला इनकमिंग WhatsApp ऑडिओ... स्क्रीन दिसेल, जेथे तुम्ही हे करू शकता:
  • स्वीकारा टॅप करा.
  • नामंजूर करा वर टॅप करा.
  • मला आठवण करा वर टॅप करा, त्यानंतर मी बाहेर पडताना किंवा एका तासामध्ये यांमधील तुम्हाला जेव्हा आठवण करून द्यायची आहे तो पर्याय निवडा.
  • एखाद्या मेसेजसह कॉल नाकारण्यासाठी मेसेज वर टॅप करा.
व्हॉइस कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स यांच्यात स्विच करणे
व्हॉइस कॉलमधून व्हिडिओ कॉलवर स्विच करणे
  1. व्हॉइस कॉलवर असताना, व्हिडिओ कॉल
    > स्विच करा यावर टॅप करा.
  2. ज्या संपर्काशी तुम्ही बोलत आहात, त्याला तो कॉल व्हिडिओ कॉलवर स्विच करण्याची विनंती दिसेल. ते स्विच करण्याची विनंती स्वीकारू किंवा नाकारू शकतात.
व्हिडिओ कॉलमधून व्हॉइस कॉलवर स्विच करणे
  1. व्हिडिओ कॉल सुरू असताना, व्हिडिओ बंद करा
    वर टॅप करा, ज्यामुळे तुमचे व्हिडिओ कॉलिंग सुरू असल्याचे संपर्काला सूचित केले जाईल.
  2. दुसरी व्यक्तीदेखील त्यांचा व्हिडिओ बंद करते, तेव्हा तो कॉल आपोआपच व्हॉइस कॉलवर स्विच होतो.
टीप:
  • ग्रुप व्हॉइस कॉल करत असताना किंवा तो घेताना, तुमच्याकडे आणि तुमच्या संपर्कांकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन आहे याची खात्री करा.
  • व्हॉइस कॉलिंग iOS 12 किंवा त्यापुढील आवृत्ती असलेल्या iPhone वर उपलब्ध आहे.
  • तुम्ही WhatsApp द्वारे आपत्कालीन सेवांचे नंबर्स ‍ॲक्सेस करू शकत नाही, जसे की, भारतामध्ये तुम्ही WhatsApp वरून 100 हा नंबर वापरू शकत नाही. आपत्कालीन कॉल करायचा असल्यास, तुम्ही कम्युनिकेशनचे इतर मार्ग वापरणे आवश्यक आहे.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही