व्हॉइस कॉल कसा करावा

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
व्हॉइस कॉलिंगमुळे तुम्ही कॉल करत असलेली व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये असली तरीही WhatsApp डेस्कटॉप वापरून तुम्ही त्यांना मोफत कॉल करू शकता. व्हॉइस कॉलिंगसाठी तुमचे इंटरनेट कनेक्शन वापरले जाते. Windows 10 64-bit आवृत्ती 1903 व त्यापुढील आवृत्ती आणि macOS 10.13 व त्यापुढील आवृत्ती यावर डेस्कटॉप कॉलिंग वापरता येते. WhatsApp डेस्कटॉपवर सध्या ग्रुप कॉल्स करता येत नाहीत.
डेस्कटॉप कॉलिंग वापरणे
WhatsApp डेस्कटॉपवरून व्हॉइस कॉल करण्यासाठी आणि कॉल घेण्यासाठी:
 • तुमच्या कॉंप्युटरवर आणि फोनवर उत्तम इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
 • WhatsApp ला तुमच्या कॉंप्युटरच्या मायक्रोफोनचा ॲक्सेस असणे आवश्यक आहे.
 • कॉल्ससाठी तुमच्या कॉंप्युटरला ऑडिओ आउटपुट डिव्हाइस आणि मायक्रोफोन जोडलेले असणे आवश्यक आहे.
टीप: सर्वोत्तम आवाजासाठी हेडसेट वापरा. वेगळे बाह्य मायक्रोफोन आणि स्पीकर डिव्हाइसेस वापरल्याने प्रतिध्वनी निर्माण होऊ शकतो.
व्हॉइस कॉल करणे
 1. ज्या संपर्काला कॉल करायचा आहे त्याच्याबरोबर वैयक्तिक चॅट सुरू करा.
 2. व्हॉइस कॉल चिन्हावर क्लिक करा.
कॉलदरम्यान तुम्ही मायक्रोफोन चिन्हावर क्लिक करून मायक्रोफोनला म्यूट किंवा अनम्यूट करू शकता. कॉल समाप्त करण्यासाठी कॉल बंद करा वर क्लिक करा.
व्हॉइस कॉलला उत्तर देणे
तुम्हाला कॉल येत असल्यास, तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
 • कॉल स्वीकारण्यासाठी स्वीकार करा वर क्लिक करू शकता.
 • कॉल नाकारण्यासाठी नकार द्या वर क्लिक करू शकता.
 • कॉलकडे दुर्लक्ष करण्यासाठी दुर्लक्ष करा किंवा x वर क्लिक करू शकता.
व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल यांच्यात स्विच करणे
संपर्काबरोबर व्हॉइस कॉलवर असताना तुम्ही व्हिडिओ कॉलवर स्विच करण्याची विनंती करू शकता. तुमच्यासोबत व्हॉइस कॉलवर असलेला संपर्क कॉल स्विच करण्यासाठी ठीक आहे किंवा स्विच करा वर क्लिक करू शकतो किंवा नाकारण्यासाठी रद्द करा वर क्लिक करू शकतो.
 1. कॉलदरम्यान कॅमेरा चिन्हावर कर्सर न्या.
 2. कॅमेरा चिन्हावर क्लिक करा.
 3. तुमच्या संपर्काने स्विच करण्याची विनंती स्वीकारल्यास व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉलवर स्विच होईल.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही