सपोर्ट असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम्सविषयी माहिती
सध्या, आम्ही खालील डिव्हाइसेसना सपोर्ट करतो आणि तुम्ही त्यापैकीच एखादे डिव्हाइस वापरावे असे सुचवतो:
- OS 4.1 किंवा त्यापुढील आवृत्तीवर चालणारे Android डिव्हाइस
- iOS 12 किंवा त्यापुढील आवृत्तीवर चालणारे iPhone डिव्हाइस
- JioPhone आणि JioPhone2 यांसह KaiOS 2.5.0 किंवा त्यापुढील आवृत्ती
यापैकी एखादे डिव्हाइस घेतल्यावर त्यावर WhatsApp इंस्टॉल करा आणि तुमचा फोन नंबर रजिस्टर करा.
टीप:
- २४ ऑक्टोबर २०२३ पासून फक्त Android OS आवृत्ती 5.0 आणि त्यापुढील आवृत्त्यांना सपोर्ट असेल.
- पडताळणी प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला तुमच्या फोनवर कॉल किंवा एसएमएस मिळवता येणे आवश्यक आहे. फक्त वायफाय वापरणाऱ्या डिव्हाइसवर नवीन खाती सेट करण्याला आम्ही सपोर्ट करत नाही.
कशाला सपोर्ट करावे हे आम्ही कसे निवडतो
डिव्हाइसेस आणि सॉफ्टवेअरमध्ये सतत बदल होत असतात. म्हणूनच आम्ही सध्या सपोर्ट करत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम्सचे पुनरावलोकन करतो आणि त्या वेळोवेळी अपडेट करतो.
कशाला सपोर्ट करणे थांबवावे हे निवडण्यासाठी, इतर तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे आम्हीदेखील दरवर्षी कोणती डिव्हाइसेस आणि सॉफ्टवेअर्स सर्वात जुनी आणि सर्वात कमी वापर असलेली आहेत हे पाहतो. या डिव्हाइसेसमध्ये नवीनतम सुरक्षा अपडेट्सदेखील नसू शकतात किंवा WhatsApp चालवण्यासाठी आवश्यक असलेली कार्यक्षमता नसू शकते.
तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला यापुढे सपोर्ट करणे थांबवल्यास काय होईल
आम्ही तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणे थांबवण्याआधी, तुम्हाला WhatsApp वरच सिस्टीम अपग्रेड करण्याविषयी सूचित केले जाईल आणि काही वेळा आठवण करून दिली जाईल.
आम्ही सपोर्ट करत असलेल्या नवीनतम ऑपरेटिंग सिस्टीम्स सूचीबद्ध केलेल्या आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही हे पेज नियमितपणे अपडेट करू.
संबंधित लेख:
सपोर्ट असलेल्या डिव्हाइसेसविषयी माहिती