बिझनेस मेसेजेससाठी गोपनीयता आणि सुरक्षा यांबद्दल माहिती

बिझनेस मेसेजिंग
तुमच्या डिव्हाइसमधून मेसेज जाण्यापूर्वी मेसेज सुरक्षित करणाऱ्या सिग्नल एन्क्रिप्शन प्रोटोकॉलने प्रत्येक WhatsApp मेसेजला सुरक्षित केले जाते. तुम्ही एखाद्या WhatsApp Business खात्यास मेसेज करता तेव्हा तुमचा मेसेज त्या बिझनेसने निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचवला जातो.
WhatsApp यासाठी WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या किंवा मेसेजेस व्यवस्थापित करण्यासाठी व स्टोअर करण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची मदत घेणाऱ्या बिझनेससोबतची चॅट्स विचारात घेते. बिझनेसला मेसेज मिळाल्यावर त्या मेसेजला त्या बिझनेसची स्वतःची गोपनीयता धोरणे लागू होतात. तो बिझनेस या मेसेजेसवर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना किंवा व्हेंडर्सना नियुक्त करू शकतो.
काही बिझनेसेस1 ग्राहकांचे मेसेजेस स्टोअर करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी WhatsApp ची पालक कंपनी असलेल्या Meta ची निवड करू शकतात. बिझनेसेससोबतचे तुमचे मेसेजेस Facebook कोणाच्याही वैयक्तिक Facebook खात्यात दाखवणार नाही किंवा तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात हे ठरवण्यासाठी तुमचे मेसेजेस आपोआप वापरणार नाही. मात्र, बिझनेसेसना प्राप्त झालेले मेसेजेस/चॅट्स ते त्यांच्या मार्केटिंग व जाहिरातीसाठी वापरू शकतील व त्यामध्ये Meta वरील जाहिरातीचाही समावेश असू शकेल. एखाद्या बिझनेसची गोपनीयता धोरणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या बिझनेसशी संपर्क साधू शकता.
टीप: जर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्ट केलेल्या एखाद्या चॅटचे एन्क्रिप्शन स्टेटस बदलले तर तो बदल नेहमीच वापरकर्त्याला दिसतो. कोणती चॅट्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केली जातात याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचा व्हाइट पेपर पहा.
तुमचे पूर्ण नियंत्रण असते
तुमच्या मेसेजचे काय होते हे तुम्हाला कळावे याची दक्षता WhatsApp घेते. एखाद्या व्यक्तीने किंवा बिझनेसने तुम्हाला मेसेज करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना थेट चॅटमधूनच ब्लॉक करू शकता किंवा तुमच्या संपर्क यादीतून हटवू शकता. तुमचे मेसेजेस कसे हाताळले जातात हे तुम्हाला समजावे आणि तुम्हाला माहितीवर आधारित योग्य निर्णय घेता यावा याची आम्ही खबरदारी घेतो.
1२०२१ मध्ये
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही