संपर्कांना ब्लॉक कसे करावे आणि त्यांची तक्रार कशी नोंदवावी

Android
iPhone
KaiOS
तुम्हाला काही विशिष्ट संपर्कांकडून मेसेजेस, कॉल्स आलेले नको असतील किंवा त्यांची स्टेटस अपडेट्स दिसायला नको असतील, तर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. ते आक्षेपार्ह मजकूर किंवा स्पॅम पाठवत आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांची तक्रार नोंदवू शकता.
तुम्हाला किंवा इतर कोणालाही धोका आहे असे वाटल्यास कृपया तुमच्या भागातील लोकल इमर्जन्सी सर्व्हिसशी संपर्क साधा.
संपर्कास ब्लॉक करणे
  1. WhatsApp उघडा आणि सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले > नवीन जोडा... येथे जा.
  2. ज्याला ब्लॉक करायचे आहे तो संपर्क शोधा आणि त्या संपर्कावर टॅप करा.
संपर्कास ब्लॉक करण्याचे आणखी काही मार्ग खालीलप्रमाणे:
  • अनोळखी फोन नंबरसोबत झालेले चॅट उघडा. त्यानंतर, संपर्क नाव > > ब्लॉक केलेले संपर्क > ब्लॉक करा यावर किंवासंपर्कांची तक्रार करा > तक्रार करा किंवा ब्लॉक करा यावर टॅप करा.
  • तुमच्या चॅट टॅबवर जाऊन त्या संपर्कासोबत झालेल्या चॅटवर डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > संपर्क माहिती > संपर्क ब्लॉक करा > ब्लॉक करा वर टॅप करा. तुम्ही संपर्काची तक्रार नोंदवा > तक्रार करा व ब्लॉक करा वरही टॅप करू शकता. हे केल्याने त्या फोन नंबरबद्दल तक्रार नोंदवली जाईल व तो संपर्क ब्लॉक होईल.
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करणे
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत:
  • तुम्हाला या फोन नंबरवरून पहिल्यांदाच मेसेज आला असेल, तर ते चॅट उघडून ब्लॉक करा > ब्लॉक करा वर टॅप करा.
  • अनोळखी फोन नंबरसोबत झालेले चॅट उघडा. त्यानंतर, संपर्क नाव > संपर्क ब्लॉक करा > ब्लॉक करा यावर किंवा संपर्काची तक्रार करा > तक्रार करा व ब्लॉक करा यावर टॅप करा. हे केल्याने त्या फोन नंबरबद्दल तक्रार नोंदवली जाईल व तो संपर्क ब्लॉक होईल.
टीप:
  • ब्लॉक केलेले संपर्क यापुढे तुम्हाला कॉल करू शकणार नाहीत किंवा मेसेजेस पाठवू शकणार नाहीत.
  • ब्लॉक केलेल्या संपर्कांना तुमचे अखेरचे पाहिलेले, ऑनलाइन आहे, स्टेटस अपडेट्स किंवा तुमच्या प्रोफाइल फोटोमधील बदल दिसणार नाहीत.
  • एखाद्या संपर्कास ब्लॉक केल्याने तो तुमच्या संपर्क यादीतून काढला जाणार नाही, तसेच त्या संपर्काच्या फोनमधून तुमचा नंबर काढून टाकला जाणार नाही. संपर्क हटवण्यासाठी, तुम्ही तो तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून हटवणे आवश्यक आहे.
  • तुम्ही एखाद्या संपर्कास ब्लॉक करत आहात हे त्या संपर्कास कळेल का याबद्दल शंका वाटत असल्यास, कृपया हा लेख पहा.
संपर्कास अनब्लॉक करणे
  1. सेटिंग्ज > खाते > गोपनीयता> ब्लॉक केलेले वर टॅप करा.
  2. संपर्काच्या नावावर डावीकडे स्वाइप करा.
    • किंवा, संपादित करा वर टॅप करून लाल रंगाच्या वजा चिन्हावर टॅप करा.
  3. अनब्लॉक करा वर टॅप करा.
संपर्कास अनब्लॉक करण्याचे आणखी काही मार्ग:
  • संपर्कासोबत झालेले चॅट उघडा. त्यानंतर संपर्काच्या नावावर टॅप करून संपर्क अनब्लॉक करा वर टॅप करा.
  • तुमच्या चॅट टॅबवर जाऊन त्या संपर्कासोबत झालेल्या चॅटवर डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > संपर्क माहिती > संपर्क अनब्लॉक करा यावर टॅप करा.
टीप: तुम्ही ब्लॉक केलेल्या एखाद्या संपर्कास अनब्लॉक केले, तरी तो संपर्क ब्लॉक असताना त्याने पाठवलेले मेसेजेस, कॉल्स किंवा स्टेटस अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत.
संपर्काची तक्रार नोंदवणे
  1. तुम्हाला ज्यांची तक्रार नोंदवायची आहे त्या संपर्काबरोबर चॅट सुरू करा.
  2. संपर्काच्या नावावर टॅप करा, त्यानंतर संपर्काची तक्रार नोंदवा वर टॅप करा.
  3. तक्रार नोंदवा आणि ब्लॉक करा वर टॅप करा.
टीप: तुम्हाला त्या वापरकर्त्याने किंवा ग्रुपने पाठवलेले शेवटचे पाच मेसेजेस WhatsApp ला मिळतील आणि त्या वापरकर्त्याला अथवा ग्रुपला त्याबद्दल सूचित केले जाणार नाही. तक्रार नोंदवली गेली आहे अशा ग्रुपचा किंवा वापरकर्त्याचा ID, मेसेज कधी पाठवला होता आणि कोणत्या प्रकारचा मेसेज (इमेज, व्हिडिओ, मजकूर इ.) पाठवला होता यासंबंधित माहितीदेखील WhatsApp ला मिळते.
तुम्ही एखाद्या मेसेजवर जास्त वेळ दाबून ठेवूनही त्या खात्याची तक्रार नोंदवू शकता.
  1. तुम्ही मेसेजवर जास्त वेळ दाबून धरून कॉंटेक्स्ट मेनू उघडू शकता आणि तक्रार नोंदवा वर टॅप करू शकता.
  2. तक्रार नोंदवली जाण्याच्या आधी एक कन्फर्मेशन नोटिफिकेशन दिसेल. तुम्ही वापरकर्त्यास ब्लॉक करून त्यांची तक्रारही नोंदवू शकता.
एकदाच पाहता येणाऱ्या फोटोची किंवा व्हिडिओची तक्रार नोंदवणे
  1. एकदाच पाहता येणारा फोटो किंवा व्हिडिओ उघडा.
  2. तळाशी असलेल्या अधिक
    वर टॅप करा.
  3. संपर्काची तक्रार नोंदवा वर टॅप करा.
'एकदाच पहा' विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर संपर्कांना ब्लॉक कसे करावे आणि त्यांची तक्रार कशी नोंदवावी: Android | KaiOS
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही