संपर्कांना ब्लॉक कसे करावे आणि त्यांची तक्रार कशी नोंदवावी

Android
iPhone
KaiOS
तुम्हाला काही विशिष्ट संपर्कांकडून मेसेजेस, कॉल्स आलेले नको असतील किंवा त्यांची स्टेटस अपडेट्स दिसायला नको असतील, तर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. ते आक्षेपार्ह मजकूर किंवा स्पॅम पाठवत असतील, तरीदेखील तुम्ही त्यांची तक्रार नोंदवू शकता.
तुम्हाला किंवा इतर कोणालाही धोका आहे असे वाटल्यास कृपया तुमच्या भागातील लोकल इमर्जन्सी सर्व्हिसशी संपर्क साधा.
संपर्कास ब्लॉक करणे
 1. WhatsApp सेटिंग्ज > गोपनीयता > ब्लॉक केलेले > नवीन जोडा... हे उघडा
 2. ज्याला ब्लॉक करायचे आहे तो संपर्क शोधा आणि त्या संपर्कावर टॅप करा.
टीप:
 • तुम्ही तुमचा फोन नंबर बदलल्यास आणि तेच WhatsApp खाते वापरल्यास, तुमचे ब्लॉक केलेले संपर्क ब्लॉक केलेलेच राहतील. 'नंबर बदला' फीचर कसे वापरावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
  • तुम्ही नवीन WhatsApp खाते सेट केल्यास, तुम्हाला ते संपर्क पुन्हा मॅन्युअली ब्लॉक करावे लागतील.
संपर्कास ब्लॉक करण्याचे आणखी मार्ग:
 • संपर्कासोबतचे चॅट उघडा, त्यानंतर संपर्काचे नाव > संपर्कास ब्लॉक करा > ब्लॉक करा किंवा संपर्काची तक्रार करा > तक्रार करा आणि ब्लॉक करा यावर टॅप करा.
 • तुमच्या चॅट्स टॅबमध्ये चॅट डावीकडे स्वाइप करा, त्यानंतर अधिक > संपर्क माहिती > संपर्कास ब्लॉक करा > ब्लॉक करा किंवा संपर्काची तक्रार करा > तक्रार करा आणि ब्लॉक करा यावर टॅप करा.
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करणे
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत:
 • एखाद्या फोन नंबरने तुमच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला असल्यास, तुम्ही चॅट उघडून ब्लॉक करा > ब्लॉक करा यावर टॅप करू शकता.
 • त्या फोन नंबरसोबतचे चॅट उघडा, त्यानंतर फोन नंबर > संपर्कास ब्लॉक करा > ब्लॉक करा किंवा संपर्काची तक्रार करा > तक्रार करा आणि ब्लॉक करा यावर टॅप करा.
टीप:
 • तक्रार करा आणि ब्लॉक करा यावर टॅप केल्यामुळे नंबरची तक्रार करणे आणि त्या संपर्कास ब्लॉक करणे या दोन्ही गोष्टी केल्या जातील.
 • ब्लॉक केलेले संपर्क यापुढे तुम्हाला कॉल करू शकणार नाहीत किंवा मेसेजेस पाठवू शकणार नाहीत.
 • ब्लॉक केलेल्या संपर्कांना तुमचे अखेरचे पाहिलेले, ऑनलाइन आहे, स्टेटस अपडेट्स किंवा तुमच्या प्रोफाइल फोटोमधील बदल दिसणार नाहीत.
 • एखाद्या संपर्कास ब्लॉक केल्याने तो तुमच्या संपर्क यादीतून काढला जाणार नाही, तसेच त्या संपर्काच्या फोनमधून तुमचा नंबर काढून टाकला जाणार नाही. एखादा संपर्क हटवण्यासाठी, तुम्ही तो तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून हटवणे आवश्यक आहे.
 • तुम्ही एखाद्या संपर्कास ब्लॉक करत आहात हे त्या संपर्कास कळेल का याबद्दल शंका वाटत असल्यास, कृपया हा लेख पहा.
संपर्कास अनब्लॉक करणे
 1. सेटिंग्ज > गोपनीयता > ब्लॉक केलेले यावर टॅप करा.
 2. संपर्काच्या नावावर डावीकडे स्वाइप करा.
  • किंवा, संपादित करा वर टॅप करा > लाल वजा चिन्हाच्या आयकॉनवर टॅप करा.
 3. अनब्लॉक करा वर टॅप करा.
संपर्कास अनब्लॉक करण्याचे आणखी मार्ग:
 • संपर्कासोबतचे चॅट उघडा, त्यानंतर संपर्काचे नाव > संपर्क अनब्लॉक करा वर टॅप करा.
 • तुमच्या चॅट टॅबमध्ये चॅट डावीकडे स्वाइप करा, त्यानंतर अधिक > संपर्क माहिती > संपर्कास अनब्लॉक करा यावर टॅप करा.
टीप: तुम्ही ब्लॉक केलेल्या एखाद्या संपर्कास अनब्लॉक केले, तरी तो संपर्क ब्लॉक असताना त्याने पाठवलेले मेसेजेस, कॉल्स आणि स्टेटस अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत.
संपर्काची तक्रार नोंदवणे
 1. तुम्हाला ज्यांची तक्रार नोंदवायची आहे त्या संपर्काबरोबर चॅट सुरू करा.
 2. संपर्काच्या नावावर टॅप करा, त्यानंतर संपर्काची तक्रार करा वर टॅप करा.
 3. तक्रार करा आणि ब्लॉक करा वर टॅप करा.
टीप: तुम्हाला त्या वापरकर्त्याने किंवा ग्रुपने पाठवलेले शेवटचे पाच मेसेजेस WhatsApp ला मिळतील आणि त्या वापरकर्त्याला अथवा ग्रुपला त्याबद्दल सूचित केले जाणार नाही. ज्याबद्दल तक्रार नोंदवली आहे अशा ग्रुपचा किंवा वापरकर्त्याचा ID, मेसेजेस कधी पाठवले होते आणि कोणत्या प्रकारचे मेसेजेस (उदा. इमेज, व्हिडिओ, मजकूर) पाठवले होते यासंबंधित माहितीदेखील WhatsApp ला मिळते.
तुम्ही एखाद्या मेसेजवर जास्त वेळ दाबून ठेवूनही त्या खात्याची तक्रार नोंदवू शकता.
 1. एखाद्या मेसेजवर जास्त वेळ प्रेस करा. संदर्भ मेनू उघडा आणि तक्रार करा वर टॅप करा.
 2. तक्रार नोंदवली जाण्याच्या आधी एक कन्फर्मेशन नोटिफिकेशन दिसेल. तुम्ही वापरकर्त्यास ब्लॉक करून त्यांची तक्रारही नोंदवू शकता.
एकदाच पाहता येणाऱ्या फोटोची किंवा व्हिडिओची तक्रार नोंदवणे
 1. एकदाच पाहता येणारा फोटो किंवा व्हिडिओ उघडा.
 2. तळाशी कोपऱ्यात असलेल्या अधिक
  वर टॅप करा.
 3. संपर्काची तक्रार करा वर टॅप करा.
'एकदाच पहा' विषयी अधिक जाणून घेण्यासाठी, हा लेख वाचा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही