WhatsApp वर शोध कसा घ्यावा

Android
iPhone
WhatsApp च्या 'शोध' फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील विशिष्ट मेसेजेस, फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्स शोधू शकता.
कीवर्डच्या मदतीने चॅट शोधणे
'शोध' फीचरमुळे तुम्हाला एखाद्या कीवर्डच्या मदतीने तुमच्या चॅटमध्ये शोध घेता येतो.
 1. शोधा
  वर टॅप करा.
 2. शोध फिल्डमध्ये तुम्हाला जो शब्द शोधायचा आहे तो लिहा.
 3. त्यानंतर शोध परिणामांमध्ये दिसणारा एखादा मेसेज हा चॅट विंडोमध्ये उघडण्यासाठी त्या शोध परिणामावर टॅप करा.
मीडिया शोधण्यासाठी फिल्टर्सचा वापर करणे
तुम्ही 'शोध' फीचरमध्ये फिल्टर्सचा वापर करून तुमच्या चॅटमधील फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ अशा मीडिया फाइल्स आणि डॉक्युमेंट्सचा शोध घेऊ शकता.
 1. शोधा
  वर टॅप करा.
 2. शोध फिल्डमध्ये तुम्हाला जो शब्द शोधायचा आहे तो लिहा.
 3. तुम्हाला जो मीडिया प्रकार शोधायचा आहे तो मीडिया प्रकार निवडा.
 4. शोध परिणामांमध्ये दिसणारा एखादा मेसेज हा चॅट विंडोमध्ये उघडण्यासाठी त्या शोध परिणामावर टॅप करा.
आशय प्रकारानुसार मीडिया फिल्टर करणे
तुम्ही सर्व फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ किंवा डॉक्युमेंट्स पाहू शकता.
 1. शोधा
  वर टॅप करा.
 2. यांपैकी ज्या कॅटेगरीमधील मीडिया फाइल्स पाहायच्या आहेत, त्या फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ किंवा डॉक्युमेंट्स कॅटेगरीवर टॅप करा.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट शोधणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
 2. अधिक पर्याय
  > शोध यावर टॅप करा.
 3. शोध बारमध्ये कीवर्ड एंटर करा.
 4. शोधण्यासाठी भिंगाच्या आयकॉनवर टॅप करा.
ग्रुप्स शोधणे
तुम्ही ज्या ग्रुप्सचा भाग आहात ते ग्रुप्स चॅट्स टॅबमध्ये आढळू शकतात. तुम्ही ग्रुपचे नाव किंवा आशयानुसारही ग्रुप शोधू शकता.
 • तुम्हाला ग्रुप आढळत नसल्यास, चॅट्स टॅब मध्ये संग्रहित केलेली चॅट्स हा विभाग नक्की पहा.
 • तुम्ही शोधत असलेला ग्रुप तुम्हाला चॅट्स टॅबमध्ये दिसत नसल्यास, तुम्ही कदाचित त्या ग्रुपचे सहभागी सदस्य नसाल.
 • तुम्हाला ग्रुपमध्ये सामील व्हायचे असल्यास, तुम्ही ग्रुप ॲडमिनला तुम्हाला जोडण्यास किंवा आमंत्रण लिंक पाठवण्यास सांगणे गरजेचे आहे.
 • तुम्ही चॅट्स टॅबमधील वैयक्तिक चॅट्सपासून ग्रुप्स वेगळे करू शकत नाही.
 • सुलभरीत्या ॲक्सेस करता यावा यासाठी तुम्ही ग्रुप पिन करू शकता. चॅट कसे पिन करावे याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
टीप: तुम्ही अलीकडेच WhatsApp वरील तुमचे पूर्वीचे चॅट रिस्टोअर केले असल्यास, तुमच्या पूर्वीच्या चॅटच्या साइझनुसार शोध डेटाबेस पुन्हा तयार करण्यासाठी तीन दिवस लागू शकतात. या कालावधीमध्ये WhatsApp जबरदस्तीने बंद करू नका.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही