खाते चोरीला जाणे

खाते चोरीला जाण्याविषयी माहिती
तुम्ही तुमचा WhatsApp एसएमएस व्हेरिफिकेशन कोड इतरांसोबत शेअर करू नये, अगदी ते तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक असले तरीही. कोणीतरी लबाडी करून तुम्हाला तुमचा कोड शेअर करण्यास भाग पाडले असल्यास आणि त्या कारणास्तव तुम्ही तुमच्या WhatsApp खात्याचा ॲक्सेस गमावला असल्यास, तुमचे खाते परत कसे मिळवावे याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या खालील सूचना वाचा.
कोणीतरी दुसरीच व्यक्ती तुमचे खाते वापरते आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ती व्यक्ती तुमच्या नावाने चॅट आणि ग्रुप्समध्ये मेसेज करू शकते हे ध्यानात घेऊन तसे तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना सूचित करा. कृपया लक्षात ठेवा, WhatsApp एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देते आणि तुमचे सर्व मेसेजेस तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेले असतात. याचाच अर्थ दुसऱ्या डिव्हाइसवरून तुमचे खाते ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तुमची पूर्वीची संभाषणे वाचता येणार नाहीत.
तुमचे खाते परत कसे मिळवावे
तुमचा फोन नंबर वापरून WhatsApp मध्ये साइन इन करा आणि एसएमएसद्वारे मिळालेला ६ अंकी कोड वापरून तुमच्या फोन नंबरची पडताळणी करा. पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमच्या फोन नंबरची पडताळणी करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे मदत केंद्र पहा: Android | iPhone.
तुम्ही ६ अंकी कोड एंटर केला की तुमचे खाते वापरणारी व्यक्ती आपोआप लॉग आउट होईल.
तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन कोडही एंटर करण्यास सांगितले जाऊ शकते. तुम्हाला हा कोड माहीत नसल्यास त्याचा अर्थ असा होतो की, तुमचे खाते वापरणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीने टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू केले होते. अशा परिस्थितीमध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन कोडशिवाय साइन करण्यासाठी तुम्हाला ७ दिवस वाट पाहावी लागेल. तुम्हाला हा व्हेरिफिकेशन कोड माहीत असो किंवा नसो, तुम्ही ६ अंकी एसएमएस कोड एंटर केल्यावर तुमचे खाते वापरणारी ती दुसरी व्यक्ती लॉग आउट होतेच. टू-स्टेप व्हेरिफिकेशनविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
टीप: काही वेळा, WhatsApp आपोआप तुमच्या फोन नंबरची पडताळणी करू शकते. अधिक जाणून घ्या.
टीप:
  • तुम्ही तुमचे खाते ॲक्सेस करू शकत असाल, पण दुसरे कोणीतरी तुमचे खाते WhatsApp वेब/डेस्कटॉपवर वापरते आहे अशी शंका आल्यास, तुम्ही सर्व कॉंप्युटर्सवर WhatsApp मधून लॉग आउट करावे अशी आम्ही शिफारस करतो.
  • दुसरे कोणीतरी तुमच्या फोन नंबरने WhatsApp खात्याची नोंदणी करायचा प्रयत्न करत असल्यास तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी WhatsApp तुम्हाला तसे सूचित करते. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही