हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन आणि खाती

खाते चोरीला जाण्याविषयी माहिती
तुम्ही तुमचा WhatsApp नोंदणी कोड कधीही इतरांसोबत शेअर करू नये, अगदी मित्र किंवा कुटुंबीयांसोबतही नाही. तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास किंवा तुम्ही तुमच्या खात्याचा ॲक्सेस गमावल्यास, खालील पायऱ्या फॉलो करून तुमचे खाते रिकव्हर करा.
कोणीतरी दुसरीच व्यक्ती तुमचे खाते वापरते आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ती व्यक्ती तुमच्या नावाने चॅट आणि ग्रुप्समध्ये मेसेज करू शकते हे ध्यानात घेऊन तसे तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना सूचित करा. कृपया लक्षात ठेवा, WhatsApp एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देते आणि तुमचे सर्व मेसेजेस तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेले असतात. याचाच अर्थ दुसऱ्या डिव्हाइसवरून तुमचे खाते ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तुमची पूर्वीची संभाषणे वाचता येणार नाहीत.
तुमचे खाते परत कसे मिळवावे
तुमच्या WhatsApp खात्याचा ॲक्सेस गमावणे
तुमचे WhatsApp खाते चोरीला गेले असल्यास, तुमच्या फोन नंबरसह WhatsApp मध्ये साइन इन करा आणि तुम्हाला एसएमएस किंवा फोनकॉलद्वारे प्राप्त होणारा ६ अंकी कोड एंटर करून पुन्हा नोंदणी करा.
तुम्ही ६ अंकी कोड वापरून तुमच्या WhatsApp खात्याची पुन्हा नोंदणी केले, की तुमचे खाते वापरणारी व्यक्ती तुमच्या खात्यातून आपोआप लॉग आउट होईल. WhatsApp वर एका वेळी फक्त एका फोन नंबरची नोंदणी करता येते.
तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन एंटर करण्यासही सांगितले जाऊ शकते. तुम्हाला तो माहीत नसल्यास, तुमचे खाते वापरणाऱ्या व्यक्तीने टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू केलेले असू शकते. टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन न वापरता साइन इन करता येण्यासाठी तुम्हाला ७ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. टू-स्टेप व्हेरिफिकेशनविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
हरवलेले किंवा चोरीस गेलेले डिव्हाइस
तुमचे डिव्हाइस हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास:
  1. तुमच्या मोबाइल प्रोव्हायडरला शक्य तितक्या लवकर कॉल करा आणि तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा.
  2. त्याच फोन नंबरसह एक नवीन सिम कार्ड मिळवा आणि तुम्हाला एसएमएस किंवा फोनकॉलद्वारे प्राप्त होणारा ६ अंकी कोड एंटर करून तुमच्या फोन नंबरची पुन्हा नोंदणी करा.
तुम्ही तुमच्या WhatsApp खात्याची ६ अंकी कोड वापरून नवीन डिव्हाइसवर पुन्हा नोंदणी केली, की तुमच्या खात्यावरून तुमचे खाते वापरणाऱ्या, हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या डिव्हाइसना आपोआप लॉग आउट केले जाते. WhatsApp वर एका वेळी फक्त एका फोन नंबरची नोंदणी करता येते.
टीप: काही वेळा, WhatsApp आपोआप तुमच्या फोन नंबरची पडताळणी करू शकते. या लेखामध्ये आणखी जाणून घ्या.
तुमचे खाते संरक्षित कसे करावे
तुम्ही तुमचे खाते रिकव्हर केले, की आम्ही तुमच्या डिव्हाइसवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन, पासकोड, फिंगरप्रिंट ॲक्सेस किंवा तुमच्या डिव्हाइससाठी उपलब्ध असलेला दुसरा सुरक्षा पर्याय कॉन्फिगर करून सुरक्षा आणखी वाढवण्याची शिफारस करतो. आमच्‍या मदत केंद्रामध्‍ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन, चॅट लॉक, किंवा स्‍क्रीन लॉकबद्दल जाणून घ्‍या.
दुसरे कोणीतरी तुमच्या फोन नंबरने WhatsApp खात्याची नोंदणी करायचा प्रयत्न करत असल्यास तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी WhatsApp तुम्हाला तसे सूचित करते. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
टीप:
  • दुर्दैवाने, तुम्ही त्या खात्याशी संबंधित फोन नंबरचे मालक असल्याची पडताळणी आम्ही करू शकत नसल्याने, आम्ही तुमचे WhatsApp खाते निष्क्रिय करू शकत नाही.
  • आम्ही तुम्हाला तुमचा फोन शोधण्यात मदत करू शकत नाही. दुसऱ्या डिव्हाइसवरून रिमोट पद्धतीने WhatsApp निष्क्रिय करता येणे शक्य नाही.
  • तुमचा फोन हरवण्यापूर्वी तुम्ही Google Drive किंवा iCloud वापरून बॅकअप तयार केला असल्यास, तुम्ही तुमचे पूर्वीचे चॅट रिस्टोअर करू शकता. मेसेजेस रिस्‍टोअर कसे करावेत हे जाणून घेण्यासाठी हा लेखपहा.
  • तुमचे खाते कोणी ॲक्सेस केले किंवा ते ॲक्सेस केल्याची वेळ आणि स्थान याबद्दल माहिती WhatsApp देऊ शकत नाही.
  • तुम्ही तुमचे खाते ॲक्सेस करू शकत आहात आणि तुम्हाला दुसरी एखादी व्यक्ती तुमचे खाते WhatsApp वेब/डेस्कटॉपवर वापरते आहे अशी शंका आल्यास, तुम्ही तुमच्या फोनवरून वेब/डेस्कटॉपवर WhatsApp मधून लॉग आउट करावे अशी शिफारस आम्ही करतो.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही