ग्रुप गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावीत
WhatsApp ने नेहमीच तुमचा फोन नंबर असलेल्या कुणालाही तुम्हाला मेसेज करू दिले आहे किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू दिले आहे. जसे तुमची संपर्क माहिती असलेले कुणीही तुम्हाला एसएमएस मेसेज किंवा ईमेल पाठवू शकतात, हे त्यासारखेच आहे.
बाय डीफॉल्ट, तुमची ग्रुप गोपनीयता सेटिंग्ज सर्वांसाठी वर सेट असतात. त्यामुळे, तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय तुमच्या संपर्क यादीत नसले, तरीही तुम्ही त्यांच्याशी सहजपणे संपर्क साधू शकता.
अतिरिक्त गोपनीयतेसाठी, तुमच्या WhatsApp मधील सेटिंग्ज बदलून तुम्हाला ग्रुपमध्ये कोण जोडू शकते यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमतादेखील आम्ही पुरवली आहे.
टीप: WhatsApp वेब किंवा डेस्कटॉपवर ग्रुप गोपनीयता सेटिंग्जमध्ये बदल करता येत नाही, पण तुमच्या फोनमधील सेटिंग्ज WhatsApp वेब आणि डेस्कटॉपशी सिंक केली जातील.
ग्रुप गोपनीयता सेटिंग्ज बदलणे
- WhatsApp सेटिंग्ज वर जा:
- Android: अधिक पर्याय> सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > ग्रुप्स यावर टॅप करा.
- iPhone: सेटिंग्ज > गोपनीयता > ग्रुप्स यावर टॅप करा.
- KaiOS: पर्याय > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > ग्रुप्स यावर प्रेस करा.
- Android: अधिक पर्याय
- खालीलपैकी एक पर्याय निवडा:
- प्रत्येकजण: तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधील संपर्क तसेच ॲड्रेस बुकमध्ये नसलेल्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या मंजुरीशिवाय ग्रुप्समध्ये जोडू शकतात.
- माझे संपर्क: फक्त तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधील संपर्क तुम्हाला तुमच्या मंजुरीशिवाय ग्रुप्समध्ये जोडू शकतात. तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये नसलेला ग्रुप ॲडमिन तुम्हाला ग्रुपमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत असल्यास, ते तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकणार नाहीत असे सूचित करणारी पॉप-अप सूचना त्यांना मिळेल आणि त्यानंतर वैयक्तिक चॅटद्वारे खाजगीरीत्या ग्रुप आमंत्रण पाठवण्यासाठी ग्रुपवर आमंत्रित करा वर टॅप करण्याची किंवा पुढे सुरू ठेवा वर प्रेस करण्याची आणि त्यानंतर 'पाठवा' बटणावर प्रेस करण्याची सूचना मिळेल. आमंत्रण एक्स्पायर होण्यापूर्वी ते स्वीकारण्यासाठी तुमच्याकडे तीन दिवस असतील.
- यांना वगळा...: फक्त तुम्ही वगळलेले संपर्क सोडून तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधील सर्व संपर्क तुम्हाला तुमच्या मंजुरीशिवाय ग्रुप्समध्ये जोडू शकतात. हे वगळता माझे संपर्क… हे निवडल्यानंतर तुम्ही वगळण्यासाठी संपर्क शोधू किंवा निवडू शकता. तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये नसलेला ग्रुप ॲडमिन तुम्हाला ग्रुपमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत असल्यास, ते तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकणार नाहीत असे सूचित करणारी पॉप-अप त्यांना सूचना मिळेल आणि त्यानंतर वैयक्तिक चॅटद्वारे खाजगीरीत्या ग्रुप आमंत्रण पाठवण्यासाठी ग्रुपवर आमंत्रित करा वर टॅप करण्याची आणि त्यानंतर 'पाठवा' बटणावर टॅप करण्याची सूचना मिळेल. आमंत्रण एक्स्पायर होण्यापूर्वी ते स्वीकारण्यासाठी तुमच्याकडे तीन दिवस असतील.
- सूचना मिळाल्यास, पूर्ण करा वर टॅप करा किंवा ठीक आहे वर प्रेस करा.
संबंधित लेख: