Opera वर नोटिफिकेशन्स न मिळणे

वेब आणि डेस्कटॉप
तुम्हाला WhatsApp वेबवर नोटिफिकेशन्स मिळत नसतील, तर तुमच्या ब्राउझरमध्ये नोटिफिकेशन्स सुरू आहेत याची खात्री करा.
नोटिफिकेशन्स सुरू करणे
  1. तुमच्या ब्राउझरमध्ये, तुमच्या चॅट्सच्या सूचीच्या वर असलेल्या निळ्या बॅनरमधील डेस्कटॉप नोटिफिकेशन्स सुरू करा वर क्लिक करा.
  2. त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करा.
टीप: तुम्हाला निळे बॅनर दिसत नसल्यास, पेज रिफ्रेश करा. तुम्हाला अजूनही बॅनर दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्स म्यूट किंवा बंद केली असल्याची शक्यता आहे.
नोटिफिकेशन्स अनब्लॉक करणे
  1. तुमच्या ब्राउझरमध्ये, सुलभ सेटअप आयकॉन > संपूर्ण ब्राउझर सेटिंग्जवर जा यावर क्लिक करा.
    • किंवा, Opera > सेटिंग्ज यावर क्लिक करा.
  2. गोपनीयता आणि सुरक्षा > साइट सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स यावर क्लिक करा.
  3. नोटिफिकेशन्स पाठवण्याची अनुमती नाही सूचीमध्ये "https://web.whatsapp.com" असल्यास, त्यापुढील अधिक आयकॉन > अनुमती द्या यावर क्लिक करा.
तुम्ही "web.whatsapp.com" च्या बाजूच्या लॉक आयकॉनवर क्लिक करूनही हे करू शकता. नोटिफिकेशन्स चा ड्रॉपडाउन मेनू ब्लॉक करा वर सेट केलेला असल्यास तो बदलून अनुमती द्या वर सेट करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही