WhatsApp QR कोड कसा स्कॅन करावा

Android
iPhone
WhatsApp QR कोड स्कॅन करणे हा WhatsApp वर असलेल्या बिझनेसशी कनेक्ट करण्याचा एक साधासोपा मार्ग आहे. WhatsApp कॅमेऱ्याने फक्त अधिकृत WhatsApp QR कोड स्कॅन करता येतात.
बिझनेसचा QR कोड स्कॅन करणे
स्वत: स्कॅन करणे
  1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
  3. कोड स्कॅन करा वर टॅप करा.
  4. QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे डिव्हाइस QR कोडच्या वर धरा.
  5. चॅट करणे सुरू ठेवा वर टॅप करा.
  6. एखाद्या बिझनेसला संपर्क म्हणून जोडायचे असल्यास जोडा वर टॅप करा.
तुम्ही WhatsApp कॅमेऱ्याच्या मदतीनेही स्कॅन करू शकता. त्यासाठी:
  1. WhatsApp उघडा आणि कॅमेरा
    वर टॅप करा.
  2. QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे डिव्हाइस QR कोडच्या वर धरा.
गॅलरीतून स्कॅन करणे
  1. WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या नावाच्या बाजूला दिसणाऱ्या QR चिन्हावर टॅप करा.
  3. कोड स्कॅन करा वर टॅप करा.
  4. स्क्रीनच्या तळाशी दिसणाऱ्या गॅलरी चिन्हावर टॅप करा.
  5. फोनमधील गॅलरी मधून WhatsApp QR कोड असलेली इमेज निवडा किंवा तुमच्या 'फोटो' ॲप मधून निवडण्यासाठी अधिक
    > फोटो वर टॅप करा.
  6. ठीक आहे वर टॅप करा.
WhatsApp कॅमेऱ्यातून स्कॅन करणे
  1. WhatsApp उघडा आणि कॅमेरा
    वर टॅप करा.
  2. स्कॅन करण्यासाठी WhatsApp QR कोड असलेली इमेज निवडा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही