तुमचा WhatsApp QR कोड शेअर करणे

Android
iPhone
  1. WhatsApp उघडा > आणखी पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या नावाशेजारी दिसणाऱ्या QR आयकॉनवर टॅप करा.
  3. शेअर करा
    वर टॅप करा.
  4. हा कोड ज्याच्यासोबत शेअर करायचा आहे तो संपर्क किंवा ज्यातून शेअर करायचा आहे ते ॲप निवडा. त्यानंतर, हिरव्या बाणावर टॅप करा.
  5. तुम्ही हेदेखील करू शकता:
    • क्रॉप करणे किंवा फिरवणे: QR कोड इमेज क्रॉप करण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी
      वर टॅप करा.
    • कॅप्शन देणे: मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या फील्डमध्ये मेसेज एंटर करा.
    • मागे जाणे: तुम्ही तुमच्या QR कोड इमेजमध्ये केलेले बदल रद्द करून इमेज पूर्ववत करण्यासाठी मागे जा
      वर टॅप करा.
  6. पाठवा
    वर टॅप करा.
टीप: तुमचा WhatsApp QR कोड फक्त तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच शेअर करा. कारण, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत WhatsApp QR कोड शेअर केला आहे, ती व्यक्ती तो कोड दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करू शकते आणि ती दुसरी व्यक्ती तुमचा कोड स्कॅन करून तुम्हाला संपर्क यादीत जोडू शकते.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही