मीडिया फाइल्स डाउनलोड करता किंवा पाठवता न येणे

Android
तुम्हाला फोटो, व्हिडिओ किंवा व्हॉइस मेसेजेस पाठवताना किंवा ते डाउनलोड करताना समस्या येत असतील, तर खालील गोष्टी तपासून पहा :
  • तुमच्या फोनवर सक्रिय इंटरनेट कनेक्शन आहे आणि उत्तम सिग्नल आहे. खात्री करण्यासाठी वेबपेज लोड करून पहा.
  • तुमच्या फोनवरील तारीख आणि वेळ योग्यरीत्या सेट केलेली आहे. तुमची तारीख चुकीची असेल, तर मीडिया फाइल्स डाउनलोड करण्यासाठी तुम्ही WhatsApp सर्व्हर्सशी कनेक्ट करू शकणार नाही. तुमची तारीख योग्यरीत्या कशी सेट करावी हे येथे जाणून घ्या.
तरीही समस्या कायम राहिली, तर तुमच्या SD कार्डमध्ये समस्या असू शकेल. हे तपासून पाहण्यासाठी तुमच्या SD कार्डमध्ये खालील गोष्टी आहेत का ते पहा :
  • स्टोरेजसाठी पुरेशी मोकळी जागा आहे का ते तपासा. तुमच्या SD कार्डवर पुरेशी जागा असूनही तुम्हाला त्यावर WhatsApp वरून कोणत्याही फाइल्स डाउनलोड करता येत नसतील, तर तुम्ही तुमच्या SD कार्डवरील WhatsApp डेटा हटवणे आवश्यक असू शकते.
  • रीड-ओन्ली मोड बंद आहे का ते तपासा.
वरीलपैकी कोणत्याही उपायाने समस्येचे निराकरण झाले नसल्यास त्याचा अर्थ तुमचे SD कार्ड करप्ट झाले आहे असा होतो. असे असल्यास, तुम्ही तुमचे SD कार्ड पुन्हा फॉरमॅट करणे किंवा नवीन SD कार्ड खरेदी करणे आवश्यक असू शकते.
टीप: तुमचे SD कार्ड पुन्हा फॉरमॅट केल्याने SD कार्डवरील सर्व आशय मिटवला जाईल.
सूचीबद्ध केलेल्या सर्व पायऱ्या वापरूनही तुम्हाला समस्या येत असल्यास, कृपया पुढील गोष्टी करून पहा:
  • तुम्ही WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरत आहात याची खात्री करा किंवा आवश्यक असल्यास, ते अपडेट करा. WhatsApp कसे अपडेट करावे याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
  • तुमची WhatsApp आवृत्ती योग्य असल्यास, तुमचे डिव्हाइस पुन्हा सुरू करा.
  • तुमचा फोन पुन्हा सुरू करूनही समस्येचे निराकरण न झाल्यास, त्यावर ऑपरेटिंग सिस्टीमची नवीनतम आवृत्ती असल्याची खात्री करा. आवश्यक असल्यास अपडेट इंस्टॉल करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही