'खाते सुरक्षा' याबद्दल उपयुक्त टिपा
तुमचे WhatsApp खाते अधिक सुरक्षित ठेवायचे असेल तर, तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- तुमचा नोंदणी कोड किंवा टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन नंबर कोणाबरोबरही शेअर करू नका.
- टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा आणि भविष्यात कधी पिन नंबर विसरायला झाल्यास अडचण होऊ नये म्हणून तुमचा ईमेल ॲड्रेस द्या.
- डिव्हाइस कोड सेट करा.
- तुमचा फोन कोणकोण प्रत्यक्ष वापरत आहे याबाबत जागरूक रहा. एखादी व्यक्ती तुमचा फोन प्रत्यक्ष वापरत असेल, तर ती तुमच्या परवानगीशिवाय तुमचे WhatsApp खातेदेखील वापरू शकते हे लक्षात घ्या.
तुम्ही हा सल्ला तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही द्यावा असे आम्ही सुचवतो. यामुळे त्यांना त्यांचे WhatsApp खाते सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.
टीप: तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन नंबर रिसेट करण्यासाठी किंवा नोंदणी कोड रिसेट करण्यासाठी लिंक मिळाली असल्यास, पण तुम्ही अशाप्रकारची कोणतीही विनंती केलेली नसल्यास, त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. कोणीतरी तुमचा फोन नंबर WhatsApp वर वापरण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे.

माहिती स्रोत
- तुमचे खाते कोणीतरी चोरले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर, चोरीला गेलेले खाते परत कसे मिळवावे हा लेख पहा.
- WhatsApp वर सुरक्षित कसे रहावे याविषयी जाणून घ्या.