WhatsApp QR कोड स्कॅन कसा करावा
Android
iPhone
तुम्ही WhatsApp QR कोड स्कॅन करून तुमच्या मित्राची/मैत्रीणीची किंवा कुटुंबीयांची संपर्क माहिती तुमच्या संपर्क यादीत जोडू शकता.
WhatsApp QR कोड स्कॅन करणे
स्वत: स्कॅन करणे
- अधिक पर्याय> सेटिंग्ज यावर टॅप करा.
- तुमच्या नावाशेजारी दिसणाऱ्या QR कोड वर टॅप करा.
- कोड स्कॅन करा वर टॅप करा.
- QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे डिव्हाइस QR कोडच्या वर धरा.
- संपर्कांमध्ये जोडा वर टॅप करा.
WhatsApp मध्ये तुमचा कॅमेरा वापरून स्कॅन करणे
- कॅमेरावर टॅप करा.
- QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे डिव्हाइस QR कोडच्या वर धरा.
- संपर्कांमध्ये जोडा वर टॅप करा.
गॅलरीतून स्कॅन करणे
- अधिक पर्याय> सेटिंग्ज यावर टॅप करा.
- तुमच्या नावाशेजारी दिसणाऱ्या QR कोड वर टॅप करा.
- कोड स्कॅन करा वर टॅप करा.
- स्क्रीनच्या तळाशी असलेल्या गॅलरी आयकॉनवर टॅप करा.
- तुमच्या गॅलरी मधून WhatsApp QR कोड निवडा किंवा तुमच्या फोटो मधून तो निवडण्यासाठी अधिक> फोटो यावर टॅप करा.
- ठीक आहे वर टॅप करा.
- संपर्कांमध्ये जोडा वर टॅप करा.
नवीन संपर्क स्क्रीनवरून स्कॅन करणे
- नवीन चॅटवर टॅप करा.
- नवीन संपर्क शेजारील QR कोड वर टॅप करा.
- कोड स्कॅन करा वर टॅप करा.
- संपर्कांमध्ये जोडा वर टॅप करा.
WhatsApp कॅमेरा वापरून फोटोमधून स्कॅन करणे
- कॅमेरावर टॅप करा.
- स्कॅन करण्यासाठी QR कोडची इमेज निवडा.
- जोडा वर टॅप करा.
चॅटमधून स्कॅन करणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटवर जा.
- कॅमेरा आयकॉनवर टॅप करा.
- स्कॅन करण्यासाठी QR कोडची इमेज निवडा.
- संपर्कांमध्ये जोडा वर टॅप करा.
संबंधित लेख: