एक WhatsApp खाते अनेक फोन्सवर किंवा अनेक फोन नंबरसह वापरण्याविषयी माहिती

तुमच्या WhatsApp खात्याची पडताळणी फक्त एकाच नोंदणीकृत फोन नंबरने होऊ शकते. कृपया लक्षात घ्या, की तुमचा फोन ड्युअल सिम फोन असेल, तरीदेखील तुम्हाला WhatsApp सह पडताळणी करण्यासाठी त्यातील एकच नंबर निवडावा लागेल. दोन वेगळ्या फोन नंबरसह पडताळणी केलेले WhatsApp खाते असू शकत नाही.
तुम्ही तुमचे WhatsApp खाते वारंवार वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर स्विच करण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुम्हाला तुमच्या खात्याची पुन्हा पडताळणी करण्यापासून रोखले जाऊ शकते. कृपया तुमचे खाते वारंवार वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर आणि फोन नंबर्सवर स्विच करू नका.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही