शॉर्ट लिंक्स कशा तयार कराव्यात

तुम्ही WhatsApp Business ॲपच्या मदतीने ग्राहकांसोबत शॉर्ट लिंक शेअर करू शकता, जेणेकरून ते थेट तुमच्यासोबत चॅट सुरू करू शकतील.
ग्राहकाने WhatsApp इंस्टॉल केलेल्या डिव्हाइसवर शॉर्ट लिंक उघडल्यास, तुम्हा दोघांमधील सुरक्षित चॅट आपोआप उघडले जाते. त्यांनी वेब ब्राउझरवर शॉर्ट लिंक उघडल्यास, त्यांना तुमची बिझनेस माहिती आणि डिफॉल्ट मेसेज असलेल्या (मेसेज सेट केलेला असल्यास) वेब पेजवर पाठवले जाईल. तिथून तुमच्यासोबतचे चॅट उघडण्यासाठी ते चॅट पुढे सुरू ठेवा वर क्लिक करू शकतात.
टीप: तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये तुमचा प्रोफाइल फोटो सर्वांसोबत शेअर करण्याचा पर्याय निवडला असल्यास, वेब पेजवरदेखील तुमचा प्रोफाइल फोटो दिसेल. गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावी हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
शॉर्ट लिंक तयार करणे
तुम्ही WhatsApp Business ॲप वर खाते तयार करता, तेव्हा तुमच्या बिझनेससाठी एक शॉर्ट लिंक आपोआप तयार केली जाते. ही शॉर्ट लिंक ॲक्सेस करण्यासाठी:
 1. WhatsApp Business ॲप उघडा आणि अधिक पर्याय
  > बिझनेस टूल्स यावर जा.
 2. आपोआप तयार झालेली लिंक पाहण्यासाठी शॉर्ट लिंक वर टॅप करा.
शॉर्ट लिंकचा ॲक्सेस मिळाल्यावर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
 • शॉर्ट लिंक कॉपी करून तुमच्या वेबसाइटवर किंवा इतर कोणत्याही Facebook पेजवर पेस्ट करण्यासाठी
  वर टॅप करू शकता.
 • ही लिंक तुमच्या ग्राहकांना थेट पाठवण्यासाठी
  वर टॅप करू शकता. या लिंकचा ॲक्सेस असणाऱ्या व्यक्ती तुम्हाला मेसेज करू शकतील.
 • ग्राहक ही शॉर्ट लिंक उघडतील, तेव्हा त्यांना वापरता येईल असे मेसेज टेम्प्लेट सेट करण्यासाठी स्लायडरवर टॅप करू शकता.
 • तुमचा डिफॉल्ट मेसेज तयार करण्यासाठी आणि तो संपादित करण्यासाठी
  वर टॅप करू शकता.
बिझनेसशी संबंधित टीप: आधीपासून तयार केलेला डिफॉल्ट मेसेज असल्यास सर्वसामान्य प्रश्न किंवा चौकश्या असलेल्या ग्राहकांना तुमच्या बिझनेसपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडे विचारणा करणे आणखी सोपे होते.
संबंधित लेख:
iPhone वरील शॉर्ट लिंकविषयी माहिती
हे मदतीचे होते का?
होय
नाही