डेस्कटॉप कॉलिंगविषयी माहिती

तुमच्या कॉंप्युटरवर WhatsApp डेस्कटॉप ॲप इंस्टॉल केलेले असल्यास, तुम्ही ॲपवरील तुमच्या संपर्कांना मोफत व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करू शकता.
पुढील ऑपरेटिंग सिस्टीम्सवर डेस्कटॉप कॉलिंगला सपोर्ट आहे:
  • Windows 10 64-bit आवृत्ती 1903 आणि त्यापुढील आवृत्ती
  • macOS 10.13 आणि त्यापुढील आवृत्ती
WhatsApp डेस्कटॉपवर कॉल करण्यासाठी किंवा घेण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टी आवश्यक आहेत:
  • व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्ससाठी ऑडिओ आउटपुट डिव्हाइस आणि मायक्रोफोन.
  • व्हिडिओ कॉल्ससाठी कॅमेरा.
  • तुमच्या कॉंप्युटरचा मायक्रोफोन आणि कॅमेरा ॲक्सेस करण्यासाठी WhatsApp ला परवानगी देणे. WhatsApp ला कॉलसाठी तुमच्या कॉंप्युटरचा मायक्रोफोनचा आणि व्हिडीओ कॉलसाठी कॅमेराचा ॲक्सेस असणे आवश्यक आहे.
टीप: याक्षणी WhatsApp डेस्कटॉपवर ग्रुप कॉल्सना सपोर्ट नाही.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही