तुमच्या WhatsApp सेवा कोण प्रदान करते

१ जानेवारी २०२१ पासून लागू
तुम्ही खालील यादीत असलेल्या देशात किंवा प्रांतात ("युरोपियन प्रदेश", ज्यामध्ये युरोपियन युनियनमधील देशांचा समावेश होतो) राहात असल्यास, तुमच्या WhatsApp सेवा WhatsApp Ireland Limited द्वारे प्रदान केल्या जातात. ही कंपनी तुम्ही WhatsApp सेवा वापरत असताना तुमच्या माहितीची जबाबदारी सांभाळणारी डेटा नियंत्रक कंपनी म्हणूनही काम पाहते:
अँडोरा, ऑस्ट्रिया, अझोरेस, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनरी द्वीपसमूह, चॅनल द्वीपसमूह, क्रोएशिया, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलॅंड, फ्रान्स, फ्रेंच गयाना, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, ग्वाडलूप, हंगेरी, आइसलँड, आयर्लंड, आयल ऑफ मॅन, इटली, लाटव्हिया, लिख्टेनश्टाइन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मादेरा, माल्टा, मार्टिनिक, मायोत, मोनॅको, नेदरलॅंड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, सायप्रस प्रजासत्ताक, रियुनियन, रोमानिया, सॅन मरिनो, सेंट-मार्टिन, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, युनायटेड किंगडमचे सायप्रसमधील सार्वभौम भाग (आक्रोतिरी आणि धेकेलिया) आणि व्हॅटिकन सिटी.
तुम्ही वरील यादीत असलेल्या देशात किंवा प्रांतात राहात नसल्यास, तुमच्या WhatsApp सेवा WhatsApp LLC द्वारे प्रदान केल्या जातात.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही